विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अधिरथ :- चंपाच्या आसमंतांत राहाणारा एक सूत; हा धृतराष्ट्राचा मित्र होता. ( महाभारत ३,३०९, १७१५३ ) यास राधा नांवाची स्त्री असून, या दांपत्यानें कर्णाचें संगोपन केलें होतें. हा अंगदेशाचा राजा होता असेंहि म्हणतात; कारण कर्णाला जें अंगदेशाचें राज्य मिळालें तें याचा वारस म्हणून होय. अधिरथानें कर्णाचें वसुषेण असें नाव ठेऊन त्याला हस्तिनापुरीं द्रोणाचार्यांकडे अस्त्रविद्या शिकण्यास पाठविलें (म. भा. ३,३०८ ). महाविख्यात् कर्ण राधेय, सूतपुत्र, सूत इत्यादि नांवांनीं संबोधिला जाई.