विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अडलम  - अडलम हें कानानिटिश शहर असून जुडाच्या जातीनें व्यापलेल्या भागांत आहे. कदाचित् हेंच आधुनिक ऐ-डेकलू-मा ( बीट जीब्रीनच्या ईशान्येस ७ मैलांवर ) शहर असावें. या ठिकाणीं एक किल्ला आहे. या किल्ल्यांत डेव्हिडनें दोन वेळा आश्रय घेतला होता येथें खारेटुन ( सेंट चारिटन ) याची गुहा असल्याची दंतकथा कदाचित् धर्मयोध्यांच्या वेळेपासून प्रचारांत आली असावी. दु:खानें गांजलेले लोक, कर्जबाजारी व जीवितास कंटाळलेले. यांचें आश्रयस्थान, या अर्थानें अडलमचें वर्णन सरवाल्टर स्कॉटनें केलें आहे.
[ I Sam xxii, I; २  Sam V. १७  . Sir walter Scott Waverley ch. LVII and Old Mortality. ]