विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अजाहूत सरदेशमुख :- आपल्या मंत्र्याच्या एका नातलगाकरितां शाहूनें ' अजाहूत सरदेशमुख ' ही एक नवीन जागा निर्माण करून त्या अधिकार्याकडे कुल सरदेशमुखी बाब वसूल करण्याचें काम दिलें होतें. शाहूच्या निधनानंतर बाळाजी बाजीरावानें ती जागा नांवाला मात्र कायम ठेवली. त्यानें अजाहूत सरदेशमुखास कांहीं जमीन जहागीर करूनदेऊन दक्षिणच्या सहा सुभ्यांतील सरदेखमुखी गोळा करण्याच्या कामांत ढवळाढवळ करण्याचा त्याचा हक्क काढून घेतला. [ ग्रांट डफ ].