विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अगस्त्य - (शुद्र वैय्याकरण ) सुमारें हजार वर्षांमागें हा एक कवि शूद्र जातींत जन्मला होता.  पुराणप्रसिद्ध जो अगस्त्य ॠषि त्याचाच हा अवतार होय असें यास लोक समजतात.  तामिळ भाषेचें व्याकरण प्रथमतः यानें रचिलें,  म्हणून त्यास अगस्त्यव्याकरण असें नांव प्रसिद्ध आहे.  यांत एलकनम् याचे पांच प्रकार आहेत.  याचीं नांवें एलटू, चोलू, परलू, आप्प, आणि आलंकारु न्याय, वैद्यक, रसायनशास्त्र धर्मशास्त्र, पूजापद्धति इत्यादिकांवरही याचे ग्रंथ पुष्कळ आहेत, असें म्हणतात. वर जो आम्ही याचा काळ दाखविला, तो डॉक्टर कॉल्डवेल यांच्या मताप्रमाणें आहे. (कविचरित्र)