विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अडेसर - कच्छ मधील ( मुं. इं. ) वागडमध्यें रणावर असलेलें सुमारें तीनचार हजार लोकसंख्येचें ठिकाण. येथें धान्य व गूळ यांचा थोडासा व्यापार चालतो. येथील पडक्या भिंती १८१६ सालीं राव भारमलजीनें उडविलेल्या सरबत्तीची आठवण देतात. (मुं. गॅ.)