विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अग्रदानी - ह्या जातीची लोकसंख्या आसाममध्यें सुमारें दोनशें आहे. ब्राम्हणांच्या पोटजातीपैकीं ही एक हलकी पोटजात असून हिचे लोक प्रेतदहनाचे वेळीं मंत्र सांगतात, व श्राद्धाची दक्षणा व दानें घेतात. ( सेन्सस १९११ भाग ३. ) अग्रदानी याचा अर्थ (अग्रे दानं अस्य । ) प्रेताचें दान घेणारा ब्राम्हण असा आहे ( प्रेतोद्देशेन यद्दानं दीयते तत्प्रतिग्राही । ). याची व्याख्या खालीं दिल्याप्रमाणें आहे:-

लोभी विप्रश्च शूद्राणामग्रेदानं गृहीतवान् ।
ग्रहणे मृतदानानां अग्रदानी बभूव स: ॥