विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनकापल्ली गांव :- अनकापल्ली तहशिलीचें मुख्य ठिकाण. उत्तर अक्षांश १७० ४२' व पूर्व रेखांग ८३० २'. हा गांव शारदा नदीतीरीं विजयापट्टण गांवाच्या पश्चिमेस २० मैलांवर आहे. हा भाग सुपीक असल्यामुळें येथून धान्य व गुळ बराच बाहेरील प्रांतांत जातो. लोकसंख्या (१९२१) २०३६०. इ. स. १८७८ सालीं म्युनिसिपालिटी स्थापना झाली. इ. स. १९०३-४ मध्यें उत्पन्न २५००० खर्च २१०००. हा गांव सदर्न मराठा रेलवेचें मद्रास वाल्टेर इनवरील एक स्टेशन आहे. पाऊस सरासरी ३४.९८ इंच पडतो (अर्नोल्ड-इंडियन गाईड, इं.गॅ. ५).