विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र

अनयमुडी - (हत्तीचें कपाळ) मद्रास इलाखा. त्रावणकोर संस्थानच्या अगदीं ईशान्येकडील कोंपर्‍यास असलेलें सह्याद्रि पर्वताचें शिखर. उत्तर अक्षांश १० १०' व पूर्व रेखांश ७७ ४'. या डोंगराची उंची ८८३७ फूट असून दक्षिण हिंदुस्थानांत याच्याइतका उंच डोंगर नाहीं. या डोंगरावरून कोइमतुर, मदुरा व मलबार जिल्हे आणि त्रावणकोर व कोचीन संस्थानें या प्रदेशाचा देखावा अप्रतिम दिसतो. निरभ्र दिवशीं पश्चिमेकडे समुद्र देखील दिसतो. कॉफीची लागवड या भागांत सुरू होण्यापूर्वी येथें पुष्कळ शिकार मिळत असे. नैऋत्य दिशेकडील
पावसाळा सुरू असतां हत्तीचे कळप जंगलांत आढळतात. ( इं. गॅ. ५ )